‘या’ जिल्ह्यात साजरी झाली काळी रंगपंचमी... 

मराठा क्रांती मोर्चाकडून आगळेवेगळे आंदोलन 

<p>‘या’ जिल्ह्यात साजरी झाली काळी रंगपंचमी... </p>

सोलापूर – आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांकडून आगळेवेगळे आंदोलन केले जाते. अशा प्रकारे एक आगळेवेगळे आंदोलन सोलापूर जिल्ह्यात करण्यात आलं. सोलापूर महापालिकेत मराठा समाजाला महापौर पदाची संधी डावलल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज काळी रंगपंचमी साजरी करत सर्वांचे लक्ष वेधले.

सोलापुरात 1993 नंतर पहिल्यांदाच मराठा समाजाला महापौरपदाची संधी आली होती. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना ही संधी दिल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.  या निषेधार्थ  कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून ठिय्या मारला. आणि घोषणाबाजी देत काळी रंगपंचमी साजरी केली