भादोले - शिगांव रस्त्यावर भर दुपारी टेम्पोनं घेतला पेट
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या रियाज हजारी यांनी चार महिन्यापूर्वी छोटा टेम्पो विकत घेतला होता. आज सांगली जिल्ह्यातील बागणी इथून शिरोली कड भाड्यासाठी टेम्पो निघाला होता. दुपारी साडेबाराच्या दरम्यान हा टेम्पो भादोले गावच्या हद्दीत आला. त्यावेळी इंजन मधून अचानक धूर येवू लागला. त्यामुळे चालकानं प्रसंगावधान राखून रस्त्याकडेला टेम्पो थांबवला. मात्र अचानक आगीनं रौद्ररूप धारण केलं. या घटनेची माहिती मिळताच पेठ वडगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलातील जवानानी आग आटोक्यात आणली त्यामुळं मोठं नुकसान टळलं. मात्र आगीमुळं संपूर्ण वायरिंग, इंजिन आणि टेम्पोचा पुढील संपूर्ण भाग जळून खाक झाला. पेठवडगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.