उद्योग जगतात खळबळ : उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर गुन्हा दाखल

<p>उद्योग जगतात खळबळ : उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर गुन्हा दाखल</p>

मुंबई - पीएनबी बँकेच्या फसवणूक प्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

पंजाब नॅशनल बँकेची १०८५ कोटी रुपयांची रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
पंजाब नॅशनल बँकेचे मुख्य व्यवस्थापक संतोषकृष्ण अण्णावरपू यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीबीआयने अंबानी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  २०१३ ते २०१७ या कालावधीत अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून बँकेची मोठी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.