आज रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाजी करणाऱ्या १५० हून अधिक तरुणांवर दंडात्मक कारवाई...
कोल्हापूर – आज कोल्हापूर शहरात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मोटार सायकलवरून कर्कश आवाज करीत हुल्लडबाजी करणाऱ्या १५० हून अधिक तरुण-तरुणींवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई पोलिसांनी दुपारच्या दरम्यान केली आहे.
आज सकाळपासून मोटार सायकलवरून बेभान होवून धूम स्टाईलने काही तरुण शहरात फेरफटका मारीत होते. यावेळी एकमेकांच्या अंगावर रंग मारीत जल्लोषही करत होते. तसेच काही तरुण-तरुणी ट्रिपल सीट मोटार सायकलवरून कर्कश हॉर्न वाजवीत फिरत असताना पोलिसांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. यावेळी काहीजण मद्यप्राशन करून वाहन चालवितानाही आढळून आले. ही कारवाई राजारामपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी पोलिसांनी चौका-चौकात नाकेबंदी करून केली आहे. यावेळी पोलिसांना रस्त्यांवर पाहून काही तरुण-तरुणींनी चांगलीच पंचाईत झाल्याचे पहायला मिळाले.