पुढील सहा महिने...: इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून युद्धाबाबत महत्वाचा दावा
नवी दिल्ली - सध्या आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे अनेक देशांवर त्याचा परिणाम होवू लागला आहे. या युद्धामुळे अनेक वस्तू महाग होण्याचे संकेत मिळत आहेत. अशात इराणने युध्द सुरु ठेवण्याबाबत महत्वाचा दावा केला आहे.
इराण पुढील सहा महिने युद्ध लढू शकतो, असं रिव्होल्युशनरी गार्ड्सने म्हटल्याचं एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. गार्ड्सचे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी यांच्या म्हणण्यानुसार, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे सशस्त्र दल सध्याच्या ऑपरेशन्सच्या वेगाने किमान ६ महिने तीव्र युद्ध सुरू ठेवण्यास सक्षम आहे.”