भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडिया सज्ज...

आज ३० हून अधिक अतिरिक्त विमानांचे केले नियोजन  

<p>भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडिया सज्ज...</p>

नवी दिल्ली - विविध देशांत अडकलेल्या भारतीय प्रवाशांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एअर इंडियाने आज अबू धाबी, दुबई, मस्कत, रास अल-खैमाह आणि शारजाह येथून ३० हून अधिक अतिरिक्त विमानांचे नियोजन केल्याचे म्‍हटले आहे. एअर इंडियाने घेतलेल्या या निर्णयामुळे परदेशात अडकलेले भारतीय सुटकेचा निश्वास घेणार आहेत. 
एअर इंडियाची युरोप आणि उत्तर अमेरिकेला जाणारी विमाने सुरक्षित पर्यायी मार्गांचा वापर करत असून, ही सेवा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 
एअर इंडिया दिल्ली आणि मुंबई ते दुबई दरम्यान अतिरिक्त 'नॉन-शेड्युल्ड' विमाने चालवणार आहे. आजपासून युरोपमधील प्रमुख ठिकाणांशी पुन्हा संपर्क जोडण्याचे नियोजन सुरु असून मध्य-पूर्वेतील ८ शहरांसाठी आपली विमान सेवा सुरू ठेवणार असल्याचे इंडिगो कंपनीने सोशल मिडीयावर म्हटले आहे.