पेठ वडगावात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने 'या' मागणीसाठी साखळी उपोषण

<p>पेठ वडगावात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने 'या' मागणीसाठी साखळी उपोषण</p>

कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी जागा आरक्षित आहे. मात्र, या आरक्षित जागेवर जालंदर कदम या व्यक्तीने अतिक्रमण करून इमारत बांधलीय, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केला आहे. हे अतिक्रमण तात्काळ हटवावे, यासह अन्य मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या प्रीतम मोरे, तानाजी तासगावकर, राज आयरेकर यांनी १८ मे पासून पेठ वडगाव नगरपालिका चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे.

ही जागा अतिक्रमण मुक्त करुन महिला आणि परिसरातील नागरिकांसाठी व्यायाम शाळा उभारण्यात यावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी नियोजित असलेल्या जागेवर तात्काळ पुतळा बसवण्याची प्रक्रिया सुरू करावी, आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी, युवा सेनेचे सौरभ बुढे, भाजपचे संतोष माळी, चंद्रकांत सोनवणे, नसरुद्दीन सुतार यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.