प्रलंबित धान्य वाटप मार्जिन लवकर मिळावे : रेशन धान्य दुकानदारांची मागणी

<p>प्रलंबित धान्य वाटप मार्जिन लवकर मिळावे : रेशन धान्य दुकानदारांची मागणी</p>

कोल्हापूर - जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचे धान्य वाटप मार्जिन अद्याप मिळालेले नाहीय. ते त्वरित मिळावे, एप्रिल महिन्याची धान्य वाटप मुदत ३१ मे पर्यंत करण्यात यावी, पीओएस मशीन मधील तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर कराव्यात,या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघाच्या शिष्टमंडळाने आज सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांची भेट घेतली.

यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे, राजेश मंडलिक, गजानन हवालदार, अरुण शिंदे, रोहित सावेकर, श्रीमय शेळके, बुरहान नायकवडी, संजय चौगुले, रवी पाटील, नितीन हुंडेकरी, राहुल शिराळे यांच्यासह रेशन धान्य दुकानदार उपस्थित होते.