‘या’ विविध मागण्यांसाठी आ. सतेज पाटील यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील नवे पारगांव, जुने पारगांव आणि निलेवाडी या गावांना स्वतंत्र सज्जा मंजूर करावा, मौजे जुने पारगांव येथील १७८ पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात यावे, इचलकरंजी येथील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत, छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलनामध्ये खेळाडूंसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, यासह इतर अन्य मागण्यासाठी आ. सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची भेट घेतली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेलेकर, हातकणंगलेचे भूमी अभिलेख उपाधीक्षक जयदीप शितोळे, जिल्हा परिषद सदस्या शुभांगी कुंभार, पंचायत समिती सदस्य भारत पाटील, सामाजिक कार्यकर्ते वैभव कांबळे, प्रभाकर सांळुखे, सुरेश केसरकर, हालसवडेचे माजी सरपंच मोहन खोचगे उपस्थित होते.