व्हीआयपी दर्शनासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ...धक्काबुक्की 

<p>व्हीआयपी दर्शनासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ...धक्काबुक्की </p>

पंढरपूर – पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्यावरून मोठा राडा झाला आहे. यावेळी धक्काबुक्की आणि ढकलाढकली करून भाजप कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला आहे.
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णाराज महाडिक हे  पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी ते विठ्ठल - रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आले होते. दरम्यान  व्हीआयपी दर्शन घेण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी संतापजनक प्रकार केला आहे.  
महाडिक यांच्यासोबत त्यांचे  शेकडो कार्यकर्ते दर्शनासाठी आले होते. यावेळी  कृष्णराज महाडिक आणि त्यांच्या सोबत मोजक्या तीन ते चार लोकांना विठ्ठल मंदिरात व्हीआयपी गेटवरून प्रवेश देण्यात आला. मात्र त्यांच्यासोबत आलेल्या  भाजप कार्यकर्त्यांनी व्हीआयपी गेटवर मोठी गर्दी करून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी  ढकलाढकली झाल्याने मोठा गोंधळ उडाला.