मुरगूडमधील जनावरांच्या बाजार परिसरात नगरपालिकेची अतिक्रमणांविरोधात कारवाई...

<p>मुरगूडमधील जनावरांच्या बाजार परिसरात नगरपालिकेची अतिक्रमणांविरोधात कारवाई...</p>

कोल्हापूर - मुरगूड शहराच्या मध्यवर्ती भागात भरत असलेल्या जनावरांच्या बाजार परिसरात विजापूर येथून आलेल्या मजुरांनी अनेक वर्षापूर्वी तात्पुरती वस्ती केली होती. कालांतराने या झोपड्यांचे पक्क्‌या घरांमध्ये रूपांतर होऊ लागल्याने नागरिकांनी याबाबत तीव्र आक्षेप घेतला होता. मागील दोन वर्षांपासून ही वस्ती हटवावी, अशी मागणी सातत्याने होत होती. या ठिकाणी नगरपालिकेचे पाणी फिल्टर प्रकल्प असून भविष्यातील विकास कामांसाठी अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने संबंधितांना पूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या.

पालिकेच्या सूचनेनुसार अनाधिकृत बांधकामे हटवण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. कारवाईदरम्यान काही मजूर कुटुंबं लहान मुलांसह उपस्थित होती. संबंधितांनी आपण गेली २५ वर्षे येथे वास्तव्यास असून केवळ सहा महिने हंगामी स्वरूपात राहतो, असा दावा करत पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.