विधान परिषदेच्या १७ जागांसाठी ‘या’ दिवशी होणार निवडणूक
मुंबई – विधान परिषदेच्या १७ जागांसाठी सर्व पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ मतदारसंघांमधून आमदार निवडले जाणार असल्याने सर्वांची चढाओढ सुरु झाली आहे.
येत्या १८ जून रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय काही काळासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.