इचलकरंजीत जनावरांची अवैध वाहतूक... दोघांवर गुन्हा दाखल

<p>इचलकरंजीत जनावरांची अवैध वाहतूक... दोघांवर गुन्हा दाखल</p>

इचलकरंजी - शहरातील विकली मार्केट परिसरात रात्रीच्या सुमारास वाहनातून बेकायदेशीररित्या जनावरांची वाहतूक केली जात होती. ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने नेली जात असल्याचा संशय आल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संशयितांना विचारणा केली. मात्र त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी अझरुद्दीन इब्राहिम पठाण आणि मोबीन बेपारी या दोघांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईत तब्बल २ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार करत आहेत.