SIR ला बेकायदेशीर ठरवता येणार नाही : सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय 

<p>SIR ला बेकायदेशीर ठरवता येणार नाही : सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय </p>

नवी दिल्ली – भारतीय निवडणूक आयोगाकडून विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती यावर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने, SIR ला बेकायदेशीर ठरवता येणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.  
SIR मोहिमेमुळे मतदार याद्यांची अचूकता सुधारण्याबरोबर  मतदारांची पडताळणी पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला जात आहे यावर कोर्टाने म्हटले आहे कि,  निवडणूक आयोगाची ही मोहीम कोणत्याही प्रकारे कायद्याचे किंवा घटनेचे उल्लंघन करत नाही, असे म्हणत ही मोहीम कायदेशीर वैध असल्याचे कोर्टाने नमूद केले आहे. 
ही मोहीम म्हणजे  अचूक आणि सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्याच्या दिशेने उचललेले एक सकारात्मक पाऊल आहे. निवडणूक आयोगाची ही प्रक्रिया राज्यघटनेत नवीन प्राण फुंकणारी असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.